Loksabha 2019 : अडवाणी, मुरलीमनोहर जोशींचे तिकीट भाजप कापणार?

Loksabha 2019 : अडवाणी, मुरलीमनोहर जोशींचे तिकीट भाजप कापणार?

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मात्र, सत्ताधारी भाजपकडून अद्याप यादी जारी केली गेली नाही. त्यामुळे भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपच्या या यादीत माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप केलेली नाही. भाजपने सुमारे 250 उमेदवारांची यादी तयार केली. या यादीमध्ये भाजपच्या संसदीय समितीकडून पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपकडून अडवाणी, जोशी यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बी. सी खंडुरी आणि बी. एस. कोश्यारी यांनी आगामी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षाने तरुणांना संधी द्या, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com