Loksabha 2019 : अखेर अडवानींचा 'पत्ता' कापलाच!

Loksabha 2019 : अखेर अडवानींचा 'पत्ता' कापलाच!

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही.

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. मात्र, सत्ताधारी भाजपकडून अद्याप यादी जारी केली गेली नाही. त्यामुळे भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या या यादीत अडवानी  यांचे नाव कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, लालकृष्ण अडवानी यांनी पक्ष स्थापनेपासून मोठे योगदान दिले. मात्र, त्यांचेच नाव कापले गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com