Loksabha 2019 : तुम्हाला एकही जागा मिळणार नाही; तरी आपण एकत्र निवडणूक लढू

BJP RPI RSP
BJP RPI RSP

मुंबई : माझ्या मागं...एवढी लोक आहेत...त्यांच्या माग एवढी जनता आहे...हो का मग दाखवा...जाऊद्या मला एकही जागा दिली नाही तरी मी समाधानी आहे...बर झालं...आपण एक काम करू, तुमच्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही...तरिही आपण एकत्र निवडणूक लढवू...आणि अगदीच उमेदवारी मिळवायची असेल तर शक्ती प्रदर्शन करा मग...विचार करू. भाजप-शिवसेनेच्या महायुतीमध्ये केवळ नामधारी राहिलेल्या रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची ही परिस्थिती झाली आहे.  

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे प्रमुख रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) महादेव जानकर, शिवसंग्राम संघठनेचे विनायकराव मेटे या घटक पक्षांना एकही जागा सोडली नाही. उमेदावारी हवी असेल तर शक्ती प्रदर्शन करा अशी तंबीही देण्यात आली आहे. यातून तुम्ही आमच्या सोबत 'असला काय किंवा नसला काय' काही फरक पडत नसल्याचेच संकेत युतीकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तीनही नेत्यांची बैठक घेतली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. 

भाजपने महादेव जानकरांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. यावर मला कोणी डिवचल तर, त्याला संपवायची ताकद माझ्यात आहे. एक दिवस लाल किल्ल्यावर रासपचा झेंडा फडकविणार असल्याचीही मुक्ताफळे जानकरांनी उधळली आहेत. दुसरीकडे रामदास आठवलें यांनीही जागा वाटपामध्ये आम्हाला विचारात घेतले नसल्याने नाराज होते. मला एक जागा द्या पक्षातील कार्यकर्त्यांना मी सांभाळून घेतो. इथपर्यंतची तडजोड करण्याची तयारी दाखवली होती. तरिही भाजप-शिवसेना युतीने त्यांना डावलले. शेवटी मला एकही जागा दिली नाही तरी मी समाधानी आहे असे म्हणण्याची वेळ आठवलेंवर आली. युतीने या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनाच डावलल्याने इतर कोणीही जागा मागण्यासाठी पुढे आले नाही. 

आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी महादेव जानकर यांना मिठी मारली जानकरही कुठलिही अपेक्षा न ठेवता एकजुटीने महायुती मध्ये काम करण्यासाठी तयार झाले असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com