Loksabha 2019 : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळ केला स्फोट

naxal
naxal

गडचिरोली : अतिदुर्गम कसनसून पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ आज (ता. 11) सकाळी साडेअकराच्या सुमारास नक्षलवाद्यांनी लावलेला भूसुरुंग घडवून आणला. यात कोणतेही नुकसान झाले नाही.

या केंद्रावर मतदान सुरु असताना अचानक स्फोट झाला. यामुळे तिथे उपस्थित मतदार व  तैनात असलेल्या पोलिस जवानात एकच खळबळ उडाली.
नक्षलग्रस्त भागात चौकस सुरक्षा असतानाही स्फोट घडणून आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कालही गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घाडणून आणलेल्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com