Loksabha 2019 : मतदान करूनच वधू चढली बोहल्यावर 

बबलू जाधव 
गुरुवार, 11 एप्रिल 2019

आर्णी : लोकशाहीत एक मत अमूल्य आहे. एक मत देशाचे भाग्य घडविते. मतदानाला राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. जनजागृतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढत आहे. आर्णी येथील वधूने आधी मतदान करून नंतर ती बोहल्यावर चढली. पायल रामदास डाहाके (रा. आर्णी), असे विवाहापूर्वी मतदानाचा हक्क बजावणार्‍या विवाहितेचे नाव आहे.

उच्चशिक्षित असलेल्या पायल हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव (वळशी) येथील प्रशांत हमेश्‍वर गुल्हाने याच्याशी गुरुवारी (ता.11) सकाळी 11 वाजता दाभडी येथील ओंकारेश्‍वर मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मतदानाचे महत्त्व तिला माहित असल्याने आधी मतदान नंतर लग्न हा संकल्प तिने केला होता. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरीच्या वेशात तिने मतदान केंद्र गाठले. ग्रीनपार्कमधील देवराव पाटील शाळेतील मतदान केंद्रावर चक्क नवरी मतदानासाठी आल्याचे बघून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. उपस्थितांनी पायलचे कौतुक केले.

निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. मी उच्च शिक्षित असल्याने माझे मत देशहितासाठी हा संकल्प करून पहिले मतदान केले.
- पायल डाहाके, नववधू, आर्णी.

Web Title: Bride gets married after voting