LokSabha 2019 : उमेदवार नोकरी करणारा नसावा

LokSabha 2019 : उमेदवार नोकरी करणारा नसावा

नागपूर -  लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरणारा उमेदवार नोकरी करणारा नको, तर स्वतंत्र व्यवसाय करणारा हवा, अशी अपेक्षा नीतिमत्ता आश्‍वासन केंद्राने व्यक्त केली आहे. केंद्राने एका निवेदनाच्‍या माध्‍यमातून काही अपेक्षा उमेदवार निवडीच्या संदर्भात व्यक्त केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर होत आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने नाना पटोलेंची उमेदवाराची जाहीर केली आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याच नावाची घोषणा होणार, हे निश्‍चित आहे. मात्र, इतर छोट्या-मोठ्या पक्षांचे उमेदवार अद्याप निश्‍चित झालेले नाही. पण, नीतिमत्ता आश्‍वासन केंद्राने व्यक्त केलेल्या निकषांमध्ये हे उमेदवार बसणार की नाही, हा मोठा प्रश्‍न आहे.

नागपूर लोकसभेचा उमेदवार ४० ते ४५ वयोगटातील असावा, या निकषामध्ये भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार बसणे शक्‍य नाही. मात्र, इतर अपेक्षा पूर्ण होत आहेत की नाही, यावर आश्‍वासन केंद्राला फुटपट्टी लावून बसण्याशिवाय पर्याय नाही. 

उमेदवार हा नागपुरातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील पंजिकृत मतदार असावा, उमेदवार सभ्य-सुसंस्कृत असावा, तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदवीधर असावा, त्याच्यावर कोणताही गुन्हा नसावा, कोणत्याही वित्त संस्थेचे कर्ज त्याने बुडविलेले नसावे, वैयक्तिक आयुष्यात घोषित धर्माप्रमाणे वागणारा असावा, उमेदवार तसेच कुटुंबीयांच्या नावे असलेल्या संपत्तीचे वित्तीय मूल्य तीन कोटींपेक्षा अधिक असू नये, उमेदवाराला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा वाचता, लिहिता, बोलता येणे आवश्‍यक आहे. 

यांसारख्या काही अपेक्षा नीतिमत्ता आश्‍वासन केंद्राने व्यक्त केल्या आहेत. उमेदवाराला नागपुरातील राजकीय व सामाजिक प्रश्‍नांची जाण असावी; पण राजकीय पक्षाचा गेली दहा वर्षे सदस्य नसावा. तसेच उमेदवाराला महात्मा गांधींच्या देशकार्याचा आणि त्यांच्या सिद्धांतांचा आदर असावा, या दोन निकषांचाही उल्लेख केंद्राने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com