Loksabha 2019 : भाजप नेतेच म्हणतात, मी तर ब्राह्मण, चौकीदार नाही

swamy
swamy

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नावापुढे चोकीदार लावलेले नाही. याबद्दल त्यांना विचारले असता, 'मी माझे नाव बदलले नसून, चौकीदार हा शब्द मी माझ्या नावापुढे लावलेला नाही. कारण मी ब्राह्मण आहे आणि चौकीदाराने काय काम करावे हा आदेश देण्याचे माझे काम आहे, म्हणूनच मी माझ्या नावापुढे चौकीदार लावू शकत नाही', अशा शब्दांत स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपला टोला लगावला आहे. स्वामींचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

तामिळनाडूतील एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्वामी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरही निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थव्यवस्था कळत नाही, ते भारत हा पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे असे म्हणत आहेत, मात्र भारत संबंधित यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, असे स्वामी मुलाखतीत म्हणाले आहे. 

लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवत भाजपने 'मैं भी चौकीदार' अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार अशा शब्द जोडला. ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांचे नाव चौकीदार नरेंद्र मोदी, तर अमित शहा यांचे नाव चौकीदार अमित शहा असे झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 मार्चला या मोहिमेची सुरुवात केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com