Loksabha 2019 : हा तर कोंंबडी अन् अंड्याचा उद्योग : मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस

युवराज धोतरे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

उदगीर (जि. लातूर) : सत्तर वर्षात सातत्याने शेतकऱ्यांना लुटण्याचे पाप काँग्रेसने केले. आता राहुल गांधी म्हणतात, की शेतकऱ्यांना वर्षाला 72  हजार रुपये देणार आहे. हे 72 हजार म्हणजे कोंबडी अन् अंड्य़ाचा फसवा उद्योग आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उदगीर (जि. लातूर) : सत्तर वर्षात सातत्याने शेतकऱ्यांना लुटण्याचे पाप काँग्रेसने केले. आता राहुल गांधी म्हणतात, की शेतकऱ्यांना वर्षाला 72  हजार रुपये देणार आहे. हे 72 हजार म्हणजे कोंबडी अन् अंड्य़ाचा फसवा उद्योग आहे, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लातूर लोकसभा मतदार संघातील भाजपा सेना महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. 16) दुपारी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, अहमदपूरचे आमदार विनायक पाटील, उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यावेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ``एका व्यक्तीने त्याच्यावरील कर्ज फेडण्यासाठी एक कोंबडी घेऊन व तिच्यापासून होणाऱ्या पिलांना व अंड्याला विकून ते फेडेन असे सांगितले. एका कोंबडीपासून मिळणारी अंडी, अंड्यातून जन्मणारी पिले, या पिलांपासून होणारी अंडी विकून पैसे देईन, असे सांगत होता. कॉंग्रेसची 72 हजाराची योजना अशीच आहे. योजनेसाठी कोण पैसे देणार आणि कॉंग्रेस हे पैसे कोणाला देणार, हे त्यांनाच माहित नाही.`` साठ वर्षात स्वतःच्या चेल्याचपाट्यांची गरीबी हटवल्यानंतर गरीबी हटावचा नारा दिला जात आहे. लोकांनी भाजपला नव्हे तर देशाला सुरक्षेला मते द्या. मोदींचे नाव ऐकून विरोधक रात्री झोपेतून दचकून उठत आहेत. कॉंग्रेकडून जुन्याच घोषणा नव्याने दिल्या जात आहे. या फसव्या घोषणांना बळी न पडता नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मते द्या.`` या वेळी पालकमंत्री निलंगेकर व आमदार भालेराव यांची भाषणे झाली. भाजपला मत द्या, असे आवाहन करत आमदार भालेराव लोकांसमोर नतमस्तक झाले.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis criticizes Rahul Gandhi