Loksabha 2019 : माढा असो की बारामती कमळ फुलणारच: मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

''सोलापुरच्या जनतेमुळे शरद पवारांनी निवडणुकीतून माघार आहे. पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत आहे. ओपनिंगला आलेले पवारसाहेब 12 वा खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतले. माढा असो की बारामती येथे कमळ फुलणारच''

अकलूज : सोलापुरच्या जनतेमुळे शरद पवारांनी निवडणुकीतून माघार आहे. पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत आहे. ओपनिंगला आलेले पवारसाहेब 12 वा खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतले. माढा असो की बारामती येथे कमळ फुलणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. माढ्यात युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यात लढत होत आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्रातील सिंचनाकरीता 35 हजार कोटी केंद्र सरकारने दिले आहे. मुळशी धरणातून पाणी येथे आणण्याची आमची योजना आहे. त्यासाठी समिती बनविली आहे. या योजनेमुळे आपली शेती सुजलाम सुफलाम होईल. येथील जनता आमच्यासोबत आहे, हे या गर्दीतून दिसत आहे.

Web Title: CM Devendra Fadnavis ensures that BJP will win in both Madha and Baramati Constituency