Loksabha 2019 : फडणवीसांकडून नरेंद्र पाटलांसाठी मुंबईतून मतदानाचे आवाहन

सचिन शिंदे 
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

नरेंद्र पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन करणारी मुख्यमंत्री फडणवीस यांची व्हिडिओ क्लिप मतदारसंघात फिरते आहे.

कऱ्हाड : सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून किल्ला लढवत आहेत. नरेंद्र पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन करणारी मुख्यमंत्री फडणवीस यांची व्हिडिओ क्लिप मतदारसंघात फिरते आहे.

सातारा जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी पाटील यांच्या पाठिशी मतदारांनी उभे राहावे, असे आवाहन त्यात केले आहे. ती क्लीप प्रचारासाठी फिरवली जात आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांना निवडून आणण्यासाठी भाजपने डोरदार फिल्डींग लावली आहे, असेच दिसते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही पक्ष प्रचारत सक्रिय झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटातही त्याचे पडसाद दिसताहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्हिडीओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर ती क्लिप वाजू लागल्याने प्रचारात 'ट्विस्ट' निर्माण झाला आहे.

Web Title: CM Fadnavis Appeals to Voters for Vote to Narendra Patil