Loksabha 2019 : नेरळमध्ये आचारसंहितचे भंग, नेरळ ग्रामपंचायत कडून फिर्याद

neral.
neral.

नेरळ - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू असून, नेरळ गावात खासदार निधीमधून बनविण्यात आलेल्या रस्त्याला खासदार निधीचा उल्लेख असलेली पाटी लावणे आणि अनावरण केल्याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेरळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहिता भंग झाल्याबद्दल तक्रार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना करण्यात आल्यानंतर नेरळ ग्रामपंचायतला त्याबाबत रीतसर तक्रार देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी त्याबाबत फिर्याद दिली असून, त्या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

नेरळ गावात मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीमधून हेटकरआळी भागात तीन रस्त्यांची कामे करण्यात आली. लक्ष्मण पेमारे यांच्या घरापासून फराट यांच्या घरापर्यंत, हेमंत क्षीरसागर यांच्या घरापासून तुषार रासम घरापर्यंत, नितीन कांदळगावकर यांच्या घरापासून देशमुख यांच्या घरापर्यंत असे रस्ते खासदार निधीमधून बनविण्यात आले. सदर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने त्या रस्त्याचे उदघाटनाचा उल्लेख असलेली कोनशीला पाटी लावली. त्या पाटीवर खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेनेच्या अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांची नावे ग्रॅनाईट प्लेट वर सोनेरी अक्षरात कोरण्यात आली आहेत.याबाबत 26 मार्च रोजी नेरळ राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष निकेश गणपत म्हसे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्जतच्या प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार नोंदवून घेण्याची मागणी केली होती.

कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्या निर्देशाने नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुदडे यांनी हेटकरआळी भागात जाऊन त्या पाटीबद्दल खात्री केली आणि नंतर नेरळ पोलीस ठाण्यात खासदार निधीमधून रस्त्याचे काम करणारा ठेकेदार यावर गुन्हा दाखल करण्यात आला.नेरळ जवळील जिते येथील ठेकेदार दीपक जाधव यांच्यावर खासदार श्रीरंग बारणे हे निवडणुकीला उभे असताना,आचारसंहिता लागू असताना रस्त्याचे काम केल्याची पाटी राजकीय फायदा उठविण्यासाठी लावली असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र अधिग्रहित मालमता नुकसान कायदा 1995 खाली गुन्हा नोंद झाला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक समीर भोईर अधिक तपास करीत आहेत. आचारसंहिता भंग झाल्याचा हा राज्यातील तिसरा गुन्हा असून तक्रार झाल्यानंतर ती पाटी फोडून टाकण्यात आली असून तक्रारदार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हसे यांच्याकडे पाटी लावलेली असतानाचे फोटो आहेत. त्यामुळे आता तपास कसा होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com