Loksabha 2019 : यांच्या छातीऐवजी पोट झाले 56 इंचाचे : अशोक चव्हाण

Friday, 26 April 2019

- राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्र्यांची लायकी आहे का?

संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शहा यांचा फॉर्म भरायला जातात. उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू आहे. यांची छाती 56 इंच नाही, यांचे पोट 56 इंच झाले आहे. मुख्यमंत्री यांची लायकी आहे, का राहुल गांधी यांचा संदर्भात बोलायला, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापूर्वी संगमनेर येथे आज (शुक्रवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते

अशोक चव्हाण म्हणाले, की आज जी मंडळी पक्षाची गद्दारी करून शिवसेना व्यासपीठावर आहेत, त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. विखे पाटील यांनी आमदारीकचा राजीनामा देऊन खुशाल जिथे जायचं आहे तिथे जावे. शिवराज गया, राणी गयी, चले गये रमणसिंह आता 23 तारीख के बाद चला जायेगा चाय करनेवाला मोदी का ड्रामा.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले :

- यापुढे कोणताही भाजपचा नेता मंत्री होणार नाही
- भरमसाठ आश्वासन लोकांना दिल्याने मोदी सरकार देशात आले
- विकासाच्या मुद्द्यावर मोदी काहीच बोलत नाहीत, विकासावर बोलण्यासाठी काहीच म्हणून राष्ट्रीय सुरक्षेवर बोलत आहेत
- पुलवामा हल्ला आणि लष्कर कारवाईवर बोलत राजकारण करत आहेत
- 42 जवान हुतात्मा झाले या संदर्भात चौकशी का नाही
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भाजप येत आहे, मोदींच्या विरोधात सुप्त लाट आहे
- बाळासाहेब थोरत हे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत
- बाळासाहेब तुम्ही खप सहन केलेले आहे, यापुढे सहन करण्याची गरज नाही. दूध का दूध पाणी का पाणी झालेला आहे

सुशीलकुमार शिंदे म्हणाले :

- मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेट आहेत 
- देशात अनेक निवडणूक झाले मात्र अशा प्रकारचे निवडणूक पाहिले नाही
- देशात अनेक जाती आहेत त्यामुळे सर्व लोकांना घेऊन जाणारा एकाचं पक्ष आहे ते म्हणजे काँग्रेस
- एमआयएम म्हणजे हे कट्टर मुस्लिम पक्ष आणि अशा पक्षाबरोबर प्रकाश आंबेडकर जात आहेत
- लोकशाहीला बाधक पोहचेल अस कृत्य आंबेडकर करत आहेत
- भगवे कपडे घातलेले उमेदवार देऊन सर्व संसद भगवे करणार आहत का
- मंत्रिमंडळ परवानगी न घेता नोट बंदी का तुम्ही हुकूमशाही करत आहात का
- न्यायालयात होत असलेल्या प्रचंड हस्तक्षेपामुळे चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली
- 2004 मध्ये गुजरात दंगलीनंतर मोदी सरकारला बरखास्त करा अशी मागणी आम्ही केली होती
- राज धर्मच पालन करा अस वाजपेयी म्हणाले होते, त्यावेळी लालकृष्ण अडवानींनी मोदींना वाचवले 
- आता लालकृष्ण अडवानी कुठे आहेत

छगन भुजबळ म्हणाले :

- शिवसेना-भाजप सरकार निर्लज्ज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही सुद्धा सरकारमध्ये आहेत मग तुम्ही पण निर्लज्ज का?
- अयोध्येला गेल्यानंतर कोणी आतमध्ये घेतले नाही फक्त नदीची आरती करून परतले
- पिंपळगावला मोदी आले मात्र कांद्यावर काहीच बोले नाहीत
- मोदींना घरी पाठवायचं आहे 
- महाराष्ट्रचे पाणी गुजरातला जाणार आहे, मोदी खोट बोलत आहेत

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले :

- 70 वर्षात काँग्रेसने काय केले हे फक्त एकच प्रश्न मोदी विचारतात आज मी त्यांना सांगतो विकास फक्त आम्हीच केला आहे
- कृषी, आरोग्य, सिंचन या सर्व विभागात आम्ही केलं आहे, म्हणून आज आनंदी आहे
- जे मोदी आज मोबाईल वापरतात ते कोणी आणले कॉम्प्युटर कोणी आणले तरी मोदी विचारात काँग्रेसने काय केले
- 70 वर्षात 15 ते 16 वर्ष वेगळे पंतप्रधान होते, काँग्रेसची सत्ता 55 वर्ष होती आणि या 55 वर्षात आम्ही देशाचे चित्र बदलले
- आम्हाला विचारतात तुम्ही 5 वर्षात काय केले दिलेल्या आश्वासन पैकी एकपण पूर्ण केले नाहीत
- झूट बोलणे मे मोदी सरदार हे
- लोकतंत्र आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Ashok Chavan Criticizes Devendra Fadnavis