Loksabha 2019  : 'ईव्हीएम'वरून काँग्रेस नेत्याचे थेट सर्वोच्च न्यायालयावर आरोप

बुधवार, 22 मे 2019

- माजी खासदार उदित राज यांनी उपस्थित केला प्रश्न - थेट सर्वोच्च न्यायालयावर केले गंंभीर आरोप.

नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होत आहेत. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मतमोजणी करावी, अशी मागणी सध्या होत आहे. असे असताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही? न्यायालयही यामध्ये सहभागी आहे का? असा सवाल उपस्थित करत माजी खासदार उदित राज यांनी थेट सर्वोच्च न्यायालयावर गंभीर आरोप केले आहेत. 

उदित राज यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावर आता राज यांनी सर्वोच्च न्यायालयावरच गंभीर आरोप केले आहेत. उदित राज यांनी बुधवारी ट्विट करत निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कामे तीन महिने संथगतीने होत असतात.

तर मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले तर काय फरक पडतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.