Loksabha 2019 : महाराजांच्या नादी लागल्याने पालकमंत्री झाले भविष्यकार 

solapur
solapur

सोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा टोला माजी आमदार तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार यांनी लगावला. काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपची वाढती लोकप्रियता पाहता सोलापूरचे उमेदवार अर्ज भरतील की नाही याबाबत साशंकता आहे, असे वक्तव्य पालकमंत्री देशमुख यांनी
केले होते. त्या संदर्भात यलगुलवार यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले, काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घोषित झाले आहे.
त्यामुळे ते कसे माघार घेतील. पालकमंत्र्यांची भविष्यवाणी पाहता त्यांच्यावर महाराजांच्या संगतीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीनंतर उपजिवेकासाठी त्यांनी आताच उपाय शोधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाला विकत घेतले आहे. मीडिया बिकाऊ आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले होते. या संदर्भात विचारले असता यलगुलवार म्हणाले, या घटनेची नेमकी माहिती नाही. त्यामुळे त्या संदर्भात मी मत व्यक्त करणे योग्य होणार नाही. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच यासंदर्भात बोलेन. 

शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा सोडली तरच कांग्रेसचा प्रचार करू, अशी भूमिका माजी आमदार नरसय्या आडम यांनी घेतली आहे. त्या संदर्भात यलगुलवार म्हणाले, माकपच्या केंद्रीय समितीकडून आदेश आला की आडमही आमच्यासोबत येतील व कांग्रेसचा प्रचार करतील. तेलगु देशमनेही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. 

पत्रकार परिषदेला शिंदे आलेच नाहीत
शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याचा निरोप देण्यात आला होता. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र शिंदे आलेच नाहीत. कांग्रेस कार्यालयातून चुकीचा निरोप दिला होता. अर्ज दाखल करण्यासंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादी यांची संयुक्त पत्रकार परिषद होती, असे स्पष्टीकरण शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com