Loksabha 2019 : मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिराती

Loksabha 2019 : मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिराती

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली मध्ये मतदान केंद्रातील टेबलवर दर्शनी भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या जाहिरात असलेली वर्तमानपत्र लावण्यात आली होती. पश्चिम डोंबिवलीतील महात्मा गांधी शाळा बूथ क्रमांक 187 मध्ये हा प्रकार घडला.

ही बाब भाजपचे पश्चिम डोंबिवली अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांच्या निदर्शनात येताच त्यांनी याविषयी आपेक्ष घेतला. प्रभुघाटे यांनी मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र, टेबलवर टाकण्यासाठी चादरी न मिळाल्याने पेपर टाकले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी प्रभुघाटे यांनी मतदान केंद्रातील निर्गुडा आंबे, शोभना जावरे ब, प्रज्ञा त्रिमाखे, गीता इये  व इतर कर्मचारी यांच्या विरोधात  झोनल अधिकारी शैलेश मळेकर  यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com