LokSabha2019 : काँग्रेसकडून तिकीटासाठी 'कोट्यवधींची' मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

पी. सुधाकर रेड्डी लिहितात, तेलंगणात 2018 मध्ये झालेली विधानसभा आणि एमएलसी तर आता 2019 मधील लोकसभा निवडणूकीच्या तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाले आहेत. या सर्व गोष्टी काँग्रेस पक्षाची विचारधार, परंपरा आणि मुल्यांना धरून नाही. या सर्व गोष्टी आता पक्षात शिल्लक राहिल्या नाहीत.

हैदराबाद : लोकसभा निवडणूकीचे तिकीट देण्यासाठी करोडो रुपये मागीतल्याचा आरोप करत हैदराबाद मधील एका काँग्रेस नेत्याने पक्षाचा राजिनामा दिला. या विषयी काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना सविस्तर पत्रही लिहीले असून, हे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. पी. सुधाकर रेड्डी असे पत्र लिहिणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे.

पी. सुधाकर रेड्डी लिहितात, तेलंगणात 2018 मध्ये झालेली विधानसभा आणि एमएलसी तर आता 2019 मधील लोकसभा निवडणूकीच्या तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाले आहेत. या सर्व गोष्टी काँग्रेस पक्षाची विचारधार, परंपरा आणि मुल्यांना धरून नाही. या सर्व गोष्टी आता पक्षात शिल्लक राहिल्या नाहीत. एक मोठ्या राजकिय पक्षाचे अशा प्रकारे झालेले बाजारीकरण पाहून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यापुर्वी पक्षातील स्थानिक नेतृत्त्वात बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यामध्ये यश मिळाले नसल्याची खंतही रेड्डी यांनी त्यांच्या पत्रात व्यक्त केली आहे. 

राज्यातील तळागाळातील परिस्थिती काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्त्वापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु, पक्षातीलच काही लोकांनी तिथपर्यंत पोहचू दिले नाही. देशातील परिस्थिती पाहता दशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा अशा अनेक मुद्यांवर काँग्रेसी नेत्यांच्या भूमिका पटण्यासारख्या नाहीत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली असून लोकांच्या भावना समजून घेण्यात काँग्रेस पक्ष म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत.

letter_congress

Web Title: Congress seeking crores of rupees for tickets alleges ex AICC secretary resigns from party