Loksabha 2019 : मोदींच्या क्लीन चिटवरून निवडणूक आयुक्तांत मतभेद

Loksabha 2019 : मोदींच्या क्लीन चिटवरून निवडणूक आयुक्तांत मतभेद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आचारंसहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी मोदी-शहांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट देण्यात आली होती. त्यावरून आता निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. 

याप्रकरणी निवडणूक आयोगाने समिती नेमली होती. या समितीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांचा समावेश होता. अशोक लवासा यांचा या क्लीन चिटबाबत विरोध होता. त्यामुळेच आता लवासा यांनी आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मी निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोपही अरोरा यांनी केला.

अरोरा यांच्या या आरोपानंतर आयुक्त सुनील अरोरा यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांमध्ये मतमतांतरे असू शकतात, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com