कारणराजकारण : सुप्रिया सुळे अन् कांचन कुल समर्थकांत रंगली भन्नाट चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पारगाव सालु-मालु या गावात बारामती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खडाजंगी चर्चा झाली.

पारगाव सालु-मालु (पुणे) : पारगाव सालु-मालु या गावात बारामती मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खडाजंगी चर्चा झाली.

सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी राहुल कुल यांच्या ताब्यात असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना कर्जात बुडाला असल्याचे सांगत त्यांनी कांचन कुल यांच्या समर्थकांना धारेवर धरलेले पाहायला मिळाले.

मागील दहा वर्षांपासून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. या भागाचे त्या प्रतिनिधित्व करतात, मग मागील दहा वर्षांपासून त्यांनी नेमका काय विकास केला असा प्रश्न कांचन कुल यांच्या समर्थकांनी केला. तर भीमा पाटस साखर कारखान्यावर कांचन कुल यांच्या समर्थकांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की,  राष्ट्रवादीने हा कारखाना ताब्यात घ्यावा आणि तो चालवून दाखवावा. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. सायकल वाटप याबरोबरच अन्य केलेली कामे राष्ट्रवादी समर्थकांकडून सांगण्यात आली. एकूणच ही चर्चा भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या समर्थकांमध्ये झालेली होती आणि ती अतिशय रंगतमय वातावरणात पार पडली...

Web Title: Discussion between Supriya sule and Kanchan Kool supporters at daund