कारणराजकारण : कुरकुंभ एमआयडीसीच्या नावावर राजकारण; प्रश्न कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र कायम आहेत. आपण कारणराजकारणच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत. 

कुरकुंभ (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुरकुंभ एमायडीसीच्या नावावर राजकारण चालत असलं तरी तिथले प्रश्न मात्र कायम आहेत. आपण कारणराजकारणच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहोत. 

दरम्यान पाहिलं गेलं तर कुरकुंभ एमआयडीसीतला पाणीप्रश्न असेल, इथला प्रदूषणाचा प्रश्न असेल, नुकसान भरपाई असेल येणाऱ्या काळात जमिनीचे होणारे नुकसान किंवा कामगारांच्या पगाराचा प्रश्न असे भेडसावणारे अनेक प्रश्न आहेत. परंतु इथला कुठलाही राजकीय प्रतिनिधी लक्ष देत नाही असे इथल्या स्थानिक कामगारांचे म्हणणे आहे.

इथल्या राजकारण्यांनी इथल्या स्थानिक प्रश्नांवर प्रश्नांवर ती लक्ष द्यायला हवं असे इथल्या स्थानिक लोकांचे म्हणणं आहे. त्याचबरोबर, सातत्यानं त्याच घरातल्या लोकांना उमेदवारी देणे असो किंवा त्याच त्याच लोकांकडून प्रतिनिधित्व देणे अशा गोष्टींचा कंटाळा आलेला असून आता आम्ही नोटा सारखा पर्याय सुद्धा निवडू शकतो असेही इथल्या स्थानिक कामगारांनी सांगितलेले आहे.

Web Title: discussion with employees of Kurkumbh MIDC in KaranRajkaran