Loksabha 2019 : पैसे वाटप करताना युती, आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक 

Loksabha 2019 : पैसे वाटप करताना युती, आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक 

पनवेल : पनवेलमधील सुकापूर आणि देवद गावांमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटप करणाऱ्या युती, आघाडीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक 5 मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी आणि प्रभाग प्रमुख विनोद मोहरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

सुकापूर येथे अटक करण्यात आलेली व्यक्ती आघाडीचा कार्यकर्ता असून, त्याचे नाव प्रताप रामचंद्र आरेकर असे आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या 78 कोऱ्या व मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे 5800 रुपये रोख रक्कम असलेले 29 खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात 200 रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय त्याच्याकडे असलेल्या एका पिशवीत विविध सोसायट्यांची नावे व सदस्यांची नावे आढळली; तर देवद येथे ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. 

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संजय पाटील असे आहे. त्याच्याकडून 26 हजार 100 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. मतदारांना पैशांचे प्रलोभन दाखवण्यात आल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी कामोठे येथे पैसेवाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांविरोधात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com