Loksabha 2019 : गडकरींच्या आशीर्वादाने विजयी होणार : नाना पटोले

Due to Nitin Gadkari blessings I will be won Election says Nana Patole
Due to Nitin Gadkari blessings I will be won Election says Nana Patole

नागपूर : नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मला आशीर्वाद दिला. ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विजयी होईल, असा विश्वास नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केला.

नाना पटोले म्हणाले, की नितीन गडकरी विजयाच्या वाटचालीवर घेऊन जातील. ते माझ्यासाठी आदरणीय आहेत. विधानसभेतही मी मिहानबाबत भूमिका मांडली होती. माझी भूमिका स्पष्ट आहे. मिहानला पूर्णत्वास नेणे हा आमचा उद्देश मूळचा आहे. रामदेवबाबांना तुम्ही जमिनी दिल्या. कोट्यवधींच्या जमिनी देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. लोकांनी घाम गाळून जमिनी घेतल्या. लोकांच्या जमिनी, पैसे घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

तसेच ते पुढे म्हणाले, नितीन गडकरी यांनी मला आशीर्वाद दिला. ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी विजयी होईल, असा विश्वास आहे. मिहानबाबत विधानसभेतही मी भूमिका मांडली होती. यामध्ये दोषी असणाऱ्या लोकांना शिक्षा द्यायची हवी. मात्र, यासाठी संपूर्ण समाजाला शिक्षा देऊ नये. नितीन गडकरी आणि फडणवीस साहेबांनी सत्तेत येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाबाबत सांगितले होते. मात्र, आता जनता त्यासाठी विनंती करण्यास गेली असता त्यांना ठोकून काढा, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याकडून केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com