Loksabha 2019 : प्रचारा दरम्यान आमदार आणि नगरसेवकात बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मला प्रचाराला का बोलावले नाही असे कारण पुढे करत आयोजकांना विचारणा केली. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता शहाणे व सिमा हिरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

अंबड  : शिवसेना भाजपा युतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारा निमित्त गुरुवारी दुपारच्या सुमारास आमदार सिमा हिरे, नगरसेविका छाया  देवांग, नगरसेवक निलेश ठाकरे, भूषण राणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते फिरत होते. प्रचार करून थकल्यानंतर उत्तम नगर येथील गणपती मंदिराजवळ नाष्टा करणयासाठी थांबले सर्वजन थांबले होते.

तेवढ्यात समोरून आलेले भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मला प्रचाराला का बोलावले नाही असे कारण पुढे करत आयोजकांना विचारणा केली. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता शहाणे व सिमा हिरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. यासंदर्भात सिडको परिसरात दिवसभर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

याविषयी भाजपा नगरसेवक मुकेश शहाणे व छाया देवांग यांना विचारणा केली असता त्यांनी झालेल्या प्रकारा संदर्भात दुजोरा दिला. तर आमदार सीमा हिरे यांनी मात्र फोन उचलला नाही त्यांचे पती महेश हिरे यांच्याशी बोलणे केले असता त्यांनी असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

Web Title: During the election campaign Debate in MLA and Corporator