Loksabha2019 : बारामतीमधून 18 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सोमवारी (ता. 8) अर्ज मागे 
घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर आता 18 उमेदवार 
प्रत्यक्ष निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सोमवारी (ता. 8) अर्ज मागे 
घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर आता 18 उमेदवार 
प्रत्यक्ष निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

अंतिम उमेदवारांची यादी (पक्ष आणि निवडणूक चिन्ह)
सुप्रिया सदानंद सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ), कांचन राहुल कुल (भाजप, कमळ), नवनाथ विष्णू पडळकर (वंचित बहुजन आघाडी, कप-बशी), मंगेश नीलकांत वनशिव (बहुजन समाज पक्ष, हत्ती), दशरथ नाना राऊत (भारतीय प्रजा सुराज्य, गॅस सिलिंडर), संजय शिंदे (बहुजन मुक्‍ती पार्टी, शिट्टी), सविता भीमराव कडाळे (हिंदुस्थान जनता पार्टी, बॅटरी टॉर्च), युवराज प्रकाश भुजबळ (जन अधिकार पार्टी, गन्ना किसान) 

अपक्ष उमेदवार
शिवाजी रामभाऊ नांदखिले (किटली), दीपक शांताराम वाटविसावे (डायमंड), ऍड. 
गिरीश मदन पाटील (कोट), सुरेश बाबूराव वीर (टिलर), विजयनाथ रामचंद्र चांदेरे (ट्रॅक्‍टर चालविणारा शेतकरी), उल्हास मुगुट चोरमाले (फुटबॉल),  हेमंत बाबूराव कोळेकर पाटील (बॅट), अलंकृत अभिजित आवाडे-बिचकुले  (टीव्ही), विश्‍वनाथ सीताराम गरगडे (रोडरोलर), डॉ. बाळासाहेब अर्जुन पोळ (स्टेथोस्कोप). हे सर्व उमेदवरा असून त्यांची निवडणूकीतील चिन्हही जाहीर करण्यात आली आहेत.

Web Title: Eighteen candidates will contest election from Baramati Constituency