Loksabha 2019 : अक्षयकुमारने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीची आयोग करणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अभिनेते अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीची चौकशी निवडणूक आयोग चौकशी करणार.

कोलकता : अभिनेते अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीची चौकशी निवडणूक आयोग चौकशी करणार असल्याची माहिती आयोगाच्या एका प्रवक्‍त्याने आज दिली. एका दूरचित्र वाहिनीवरून या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते.

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ता आणि अन्य भेटी पाठवितात, असे विधान मोदींनी या मुलाखतीत केले होते. मात्र, श्रीरामपूरमधील सभेत बोलताना या मुलाखतीचा थेट उल्लेख न करता, 'आम्ही आमच्या परंपरेनुसार आमच्या पाहुण्यांचे रसगुल्ला देऊन स्वागत करतो,' असे स्पष्ट केले. तथापि, पश्‍चिम बंगालमधून मते मिळविण्यासाठी मोदी खोटे बोलत असल्याची टीका ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बंदोपाध्याय यांनी केली होती.

'बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना मला दरवर्षी ढाक्‍यातून खास मिठाई पाठवितात, हे समजल्यावर ममतादीदी यांनीही मला वर्षातून एक-दोन वेळा बंगाली मिठाया पाठविणे सुरू केले,' असेही मोदी या मुलाखतीत म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission will inquiry of Modis Interview