common leader
common leader

ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 19 मार्च 2019 चा #ElectionTracker

अखिलेश यादव
मायावती यांनी आयुष्यभर मागासवर्गीय, गरीब आणि महिलांचा सन्मान व भागीदारी साठी संघर्ष केला आहे. त्यांनी जे वर्ग वंचित समाजाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. भाजप समाजाला मागे घेऊन जाऊ पाहते आहे. जे की आम्ही #MahaParivartan च्या माध्यमातून एका चांगल्या भविष्यासाठी लढत आहोत. 

मायावती 
'गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये चहावाला म्हणून प्रचार केला आणि या निवडणूकीमध्ये चौकीदार म्हणून प्रचार केला जात आहे.  व्वा भाजपच्या सरकारमध्ये देश कसा बदलत आहे, सुंदर!

राहुल गांधी
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाभिमानावर प्रश्न उभा केला. चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या बैठकीत मोदींनी भारताच्या 'प्रादेशिक अखंडतेचा' मुद्दा उपस्थित न करण्याचा आरोप केला. काही काळापूर्वीच शी यांच्याशी झालेल्या गुजरात येथील बैठकीत मोदी यांनी चीन-भारत यांच्या सीमेवर ताणलेल्या तणावाबाबत एकही शब्द उच्चारला नसल्याची नाराजी व्यक्त केली.  

शरद पवार -
@PawarSpeaks - फेसबुक ''पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकिस्तानातील बालाकोट आणि 
इतर ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे हवाई बॉम्बहल्ल्याने नष्ट करावेत, असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला. परंतु, तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. 
सदर बैठकीत मी सल्ला दिला नसून, केंद्र सरकारच्या यासंदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांनी पाठिंबा दिला होता.''

अमित शहा -  
नव्याने शपथ घेतलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. मला विश्वास आहे, की हे नवे नेतृत्त्व गोव्याच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल. जशी वचनं दिली ती पूर्ण केली जाईल. त्यांना माझ्याकडून पुढील वाटचालीसाठी सदिच्छा. ट्विटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी
'डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना गोव्याच्या नागरिकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप शुभेच्छा! त्यांच्या कामाचा व गोव्याच्या विकासाचा आलेख असाच वाढत जावो.'- ट्विटरवर

'मागील पाच वर्षातील योग्य तथ्ये, तपशीलवार माहिती अरूण जेटली यांनी योग्य पद्धतीने मांडली आहे. फेक न्यूज पसरवणाऱ्यांसाठी हे योग्य उत्तर आहे. नक्की वाटा आणि शेअर करा.'- ट्विटरवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com