ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते

ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच!
हा आहे 4 एप्रील 2019 चा #ElectionTracker

पंतप्रधान नरेंद्र मोदी 
धन्यवाद माननीय मोहम्मद बिन झैद अल् नयान!  मी हा सन्मान अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आपले धोरणात्मक संबंध नवीन उंचीवर पोहोचले आहेत. ही मैत्री आपले नागरिक व देशाच्या शांती आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. - आबुधाबीच्या राजांना उद्देशून मोदींचे ट्विट

ममता बॅनर्जी
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी तयार केलेला 'मा, मती, मानुष' हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद होतोय. - ट्विटरवर

मायावती 
भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी यापूर्वीच मोदींना भारत आणि भारताला मोदी म्हणण्याची चूक करुन देशाचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे. हीच चूक याआधी इंदिरा गांधीनीही केली होती. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. जनता यांना कधीच माफ करणार नाही 
- ट्विटरवर

राहुल गांधी
नागपूर: काँग्रेसने आणलेली 'न्याय' योजना तज्ज्ञांशी विचार करुन मांडली आहे. त्यामुळे ही न्याय योजना देशातील गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. तसेच 'काँग्रेस काम करते आणि भाजपकडून फक्त आश्वासने दिली जातात. जेव्हा राफेल करार गेला तुम्ही तेव्हा कुठं होता. कधीतरी खोट्याचं पितळ उघडं पडतंच. मी माशाचा डोळा पाहिलाय, आता अचूक बाण मारेनच. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेतून 72 हजार रुपये मिळणार आहेत, असेही ते म्हणाले.

शरद पवार 
उमरगा: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ सभा. 'पाच वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने 70 वर्षांच्या कामकाजावर टीका आणि विरोधकांवर हल्ले करण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु केला आहे. 70 वर्षाच्या कालखंडात पाच वर्ष अटलबिहारी वाजपेयीही पंतप्रधान होते. मग त्यांनी झोपा काढल्या, असे मोदींना म्हणायचे आहे का?' असा उपरोधात्मक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

योगी अदित्यनाथ
कांग्रेसमुळेच देशाचे विभाजन झाले असून यासाठी काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये असलेले संबध कारणीभूत आहेत. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वायनाड येथून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून तेथेही मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये असलेले संबंध आपल्याला पाहायला मिळाले. ही देशहिताच्या बाजूने विचार करायचा झाल्यास गंभीर बाब आहे. काँग्रेसासून देशाला धोका निर्माण होऊ शकतो.

अरविंद केजरीवाल
आज जर दिल्ली स्वतंत्र राज्य असते तर मी 48 तासांत सिलिंग बंद केले असते. 

अमित शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यूएईकडून सर्वोच्च नागरी सन्मान 'झाएद पदका' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. भारत आणि यूएई या दोन देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 

चंद्राबाबू नायडू
प्रत्येक निवडणूक एक आव्हान घेऊन येते. संपूर्ण रात्र जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंध्र प्रदेशच्या विकासासाठी तुम्हाला चंद्रशेखर राव यांना माहिती द्यावी लागते.

अखिलेश यादव
विकास विचारतोय : पंतप्रधानांचे अच्छे दिन वाले घोषणा पत्र काय निवडणूका झाल्यावर येणार आहे का? यावेळी तर भाजपमधील लोक एक दुसऱ्यांनाही म्हणू शकत नाहीत की अच्छे दिन आने वाले है, तर जनतेशी काय सांगणार. यातून भाजपचा उल्टा प्रवास सरु झाला आहे.

प्रियंका गांधी
माझा भाऊ माझा खरा मित्र आहे आणि आतापर्यंत मी जेवढ्या लोकांना ओळखते त्यामध्ये सर्वात धाडसी व्यक्ती आहे. वायनाड तुम्ही त्यांची काळजी घ्या, तो तुम्हा निराश करणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com