ElectionTracker : आज काय म्हणाले, देशातील महत्त्वाचे राजकीय नेते?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच!
हा आहे 5 एप्रिल 2019 चा #ElectionTracker

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच!
हा आहे 5 एप्रिल 2019 चा #ElectionTracker

पंतप्रधान नरेंद्र मोदी

'ही निवडणूक भारताचे भविष्य ठरवेल. विरोधकांकडे एकच निती आहे ती म्हणजे 'चौकीदार हटवा' एक भारत, श्रेष्ठ भारत बनविणे हाच आमच्या सरकारचा संकल्प. बीएसपी सरकार जात-पात, समुदायाच्या नावे अत्याचार करते. काँग्रेसने त्यांच्या खोट्या पत्रात (जाहिरनामा) जे लिहीले आहे, त्यानुसार अर्थ होतो की मुलींसोबत राक्षसी अत्याचार करणाऱ्यांना आता जेल नाही जामीन मिळेल. असा विचार करणाऱ्याला युपीचे लोक माफ करतील का? काँग्रेसने त्यांच्या खोट्या पत्रात (जाहिरनामा) जे लिहीले आहे, त्यानुसार अर्थ होतो की मुलींसोबत राक्षसी अत्याचार करणाऱ्यांना आता जेल नाही जामीन मिळेल. असा विचार करणाऱ्याला युपीचे लोक माफ करतील का?'

योगी अदित्यनाथ 

मुस्लिम लीग नावाच्या व्हायरसनं काँग्रेसही संक्रमित झाली असून मुस्लिम लीग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. जर अशी लोक जिंकली तर देशाचं काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल. देशाला शेकडो वर्षांनी 1947 स्वातंत्र्यता मिळाली. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या देशाचं दुर्भाग्यपूर्ण पद्धतीनं विभाजन करण्यात आलं. मुस्लीम लीगमुळेच देशाचं विभाजन झालं. 

- उत्तराखंडमधल्या काशीपूर रॅलीत

मायावती

भाजप आणि स्वतः मोदींना त्यांच्या पराभवाची प्रचंड भीती असल्यामुळे ते विरोधकांवर कोणतेही आरोप करत आहेत. दहशतवाद्यांना सोडून देण्याची परंपरा भाजपची आहे बसपची नाही. दहशतवादी मसूद अझहरला सुद्धा भाजपनेच सोडले आहे आणि आता तो भारताची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे.

अमित शहा

पाच वर्षांपूर्वी भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थैर्य ईशान्येत बाधा ठरत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फक्त शांतीच आणली नाहीतर ईशान्येला लागणारी गरज पूर्ण केली. त्यामुळे आता ईशान्यकडील राज्ये विकासाच्या मार्गावर चालत आहेत.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार?

- सामनाच्या अग्रलेखातून

राहुल गांधी

पुणे: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता. 5) हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थांशी संवाद साधला. 'भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी पडले, नीरव मोदी आणि अनिल अंबानी यांनी देशाला किती नोकऱ्या दिल्या?' असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला. 

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु म्हणजे लालकृष्ण अडवानी. आपल्या गुरुला नमस्कार करणे ही परंपरा आहे. मात्र, मोदींनी त्यांना कधी नमस्कार केला नाही. याउलट मोदींनी त्यांना चप्पल मारून बाहेर काढले, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर आज (शुक्रवार) निशाणा साधला. चंद्रपूर येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते.

शरद पवार

अहमदनगर : लोकांचा समज होता की, माझे आणि मोदींचे चांगले संबंध आहेत, होतेही. ते मुख्यमंत्री होते. मी देशाचा कृषिमंत्री होतो. देशातला कोणताही मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आला की मदत करण्याची भूमिका होती. त्यावेळी पक्ष बघायचा नाही. एके दिवशी मोदी कुठंतरी म्हणाले, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. ‘काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे बोट धरतो,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Web Title: Election Tracker Today Quotes of Narendra Modi Amit Shah Akhilesh Yadav Mayawati Sharad Pawar