ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते

Election Tracker
Election Tracker

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 18 मार्च 2019 चा #ElectionTracker

अखिलेश यादव 
उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांची युती भाजपला हरविण्यासाठी सक्षम आहे. काँग्रेस पक्षाने यामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये.

एका बाजूला काही मंत्री नाव बदलण्यात व्यस्त असताना दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करण्याची परवाणगी मागण्यसाठी हतबल झाला आहे. दिवसभर शेतात कष्ट आणि चौकीदारी करून अन्नदात्याचे पोट भरत नाही. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे जिथे देशाचे पोट भरणारा शेतकरी उपाशी मरत आहे. (ट्विटर)

प्रियांका गांधी
सपा-बसपा च्या समर्थना शिवाय काँग्रेस भाजपला हरविण्यासाठी सक्षम आहे. आम्ही एकटेच निवडणूक लढवत आहोत यामध्ये आम्हाला कोणाचीही अडचण नाही. आमचे लक्ष केवळ भाजपला हरविणे एवढेच असून त्यांचेही लक्ष भाजपला हरविणे हेच आहे.

स्वराज भवनाच्या अंगणात बसल्यावर जी खोली दिसते ना तीथे माझ्या आज्जीचा जन्म झाला होता. रात्री झोपविताना आज्जी मला जॉन ऑफ आर्क च्या गोष्टी सांगायची. आजही ते शब्द ह्रदया घुमत असतात. आज्जी म्हणायची निडर बना, सगळ चांगल होईल. (ट्विटर)

अरविंद केजरीवाल
मला एक 29 वर्षांचा मुलगा भेटला. 24 वर्षांचा असताना त्याने मोदीजींना मतदान केले होते. त्याचे कारण म्हणजे रोजगाराची मिळणारी संधी. तो तरुण अजूनही बेरोजगार आहे. त्याला नोकरी मिळाली नाही अन् लग्नही झाले नाही. जर त्याने पुन्हा एकदा मोदींना मत दिलं तर तो 34 वर्षांचा होईल. तोपर्यंत खूप उशीर होईल. त्यामुळे यावेळी मोदींना मत देऊ नका.  टि्वटर

चंद्राबाबू नायडू
नेल्लोर जिल्हा एक ऐतिहासिक असा जिल्हा बनेल. नेल्लोरमध्ये भाताची शेती विशेष अशी ठरणार आहे. त्यामुळे नेल्लोरची ओळख जगभरात लवकरच होईल. नेल्लोर येथील जाहीर सभेत चंद्राबाबू नायडू बोलत होते.

मायावती
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने येथील सर्व 80 जागांवर स्वतंत्रपणे लढण्यास काहीच हरकत नाही. केवळ सप-बसपची आघाडीच भाजपला पराभूत करण्यात सक्षम आहे. उत्तरप्रदेशमधील आघाडीसाठी सात जागा सोडण्याचा संभ्रम काँग्रेसने तयार करण्याची गरज नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 
माझे मित्र मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचात नेहमी साधेपणा, माणुसकी आणि आपुलकी दिसायची. भविष्यात त्यांनी केलेली कामं ही नक्कीच स्मरणात राहतील.  (ट्विटर)

राहुल गांधी
नवी दिल्ली : भाजपच्या मै भी चौकीदार मोहिमेवर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सर्व भारतीय म्हणत आहेत चौकीदार चोर आहे, अशी टीका केली. तसेच त्यांनी कोणीतरी सुषमा स्वराज यांनाही ट्विटर हँडलला चौकीदार शब्द लावण्यास सांगावे असा सल्ला दिल्यानंतर लगेच स्वराज यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून चौकीदार सुषमा स्वराज असे करण्यात आले.

शरद पवार 
बारामती - पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला आपण दिल्याच्या बातम्या या विपर्यास असून, या विषयाचे राजकारण करण्याची आपली इच्छा नाही असा खुलासा ज्य़ेष्ठ नेते शरद पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केला आहे. पवारांच्या अथिकृत फेसबुकवर काही मिनिटांपूर्वी हा खुलासा स्वत: पवार यांनी केला आहे.

नितीश कुमार 
गोव्याचे मुख्यमंत्री, प्रसिद्ध नेते आणि समाजसेवक मनोहर पर्रीकर यांचे दु:खद निधन. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. (ट्विटर)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com