ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकिय नेते

Indian politician
Indian politician

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 14 मार्च 2019 चा #ElectionTracker

ममता बॅनर्जी -
 
कोलकाता : 14 मार्च 2007 मध्ये नंदीग्राम येथे झालेल्या अमानुष गोळीबारात अनेक शेतकऱ्यांची मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते. येथील केमिकल हबला ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडले. याच स्मृतिप्रित्यर्थ प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 14 मार्च हा दिवस 'कृषक दिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. तसेच या दिवशी 'कृषक रत्न' हा पुरस्कार शेतकऱ्यांना दिला जाईल, असेही ट्विटरद्वारे सांगितले.

प्रियांका गांधी -
 
मेरठ : प्रियांका गांधी यांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे उत्तर प्रदेशातील राजकिय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच राजकिय पक्ष आजाद यांच्यापासून हात राखून आहेत. या विषयी प्रियांका गांधी यांना विचारले असता त्यांनी मी केवळ एका संघर्ष करणाऱ्या तरुणाला भेटण्यासाठी आले होते, असे म्हटले आहे.

अखिलेश यादव -
लखनऊ : आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभावेळी समाजवादी पक्ष आणि बहूजन समाज पक्षा च्या एकत्र रॅली निघणार आहेत. यासोबतच राजकिय रणनीति विषयी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्याशी सविस्त चर्चा करण्यात आली.

दोन ट्विट- 1)कारोबारी ‘विकास’ पूछ रहा है, इस काग़ज़ी सरकार से छुटकारा कब मिलेगा.  2)BSNL, Statue of Unity और NREGA तीनों के वर्करों को वेतन नहीं मिला 45 वर्षों में सबसे ज़्यादा बेरोज़गारी है लेकिन जिनके पास नौकरी है, उन तक को पैसे नहीं मिले आँकड़े छुपा कर भाजपा ने पैसे प्रचार पर ख़र्च किए पर अब देश को प्रचार मंत्री नहीं नया प्रधान मंत्री चाहिए

नरेंद्र मोदी 
दिल्ली : '130 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे ज्या गोष्टी गेली अनेक दशकं जे शक्य नव्हतं, ते या सरकारने करून दाखवलं आहे. आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांना सर्वच क्षेत्रात यश मिळत आहे. आतापर्यंत आम्ही जनतेसाठी खूप काम केले, यापुढेही करत राहु', असे ट्विट आज (ता. 14) केले. केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी 'मोदी है तो मुमकीन है' असे ट्विट केले होते. याला रिट्विट करत मोदींनी वरील ट्विट केले.

राहुल गांधी - 
जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा मुख्य मसहुद अजहर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत चीनने भारताला पाठ दाखवली. यावर गांधी यांनी मोदींवर टिकास्त्र डागले. 
@RahulGandhi राहुल गांधी 'मोदी हे झी जिंगपिंगला घाबरले. त्यांच्या तोंडून साधा एक शब्दही निघाला नाही जेव्हा चीनने भारताविरोधात पाऊल उचलले. 

नमो यांची चीन बद्दल कुटनिती : - गुजरात येथे झींच्या मागेपुढे केले. - दिल्ली झींची गळाभेट घेतली.- चीनमध्ये झींसमोर झुकले.'

अरविंद केजरीवाल -
ट्विट : आम आदमी पक्षासोबत कोणतीही आघाडी केली जाणार नाही, असे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांनी विधान केले. त्यांचे हे विधान आश्चर्यकारक वाटत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत काहीतर गडबड आहे.

चंद्राबाबू नायडू - 
ट्विट तरुणांचे कौशल्य वाढावे यासाठी आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. एक मोठे ध्येय गाठले जावे, यासाठी आम्ही व्यावसायिकही पुरवले. आमच्याकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे

शरद पवार -
मुंबई : 'काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील अद्याप काँग्रेसमध्ये आहेत, याचा आनंद आहे,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. तसेच विखे-पाटील यांच्या अन्य वक्तव्यांवर मी काय बोलणार, असेही ते म्हणाले.

योगी अदित्यनाथ - 
जातिवाद, वंशवाद, भ्रष्टाचारावर पूर्णविराम लागत आहे. धोकेबाज लोकांचे नाव देशातून गायब होत आहे. उत्तरप्रदेशाची मिटत चाललेली ओळख परत मिळत आहे. उत्तरप्रदेशचे चित्र बदलत चालले आहे. आता ही परिवर्तनाची लाट आहे. हे परिवर्तन थांबणार नाही. उत्तरप्रेदशचा प्रवास एका नव्या दिशेने चालू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com