ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकीय नेते?

ElectionTracker : आज काय म्हणाले देशातील महत्त्वाचे राजकीय नेते?

निडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ...प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 8 एप्रिल 2019 चा #ElectionTracker

अमित शहा
भाजपने जारी केलेले संकल्प पत्र देशातील सहा कोटी जनतेच्या सूचना आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन तयार केले आहे. भाजपचे हे संकल्प पत्र जगभरातील राजकीय पक्षांसाठी आदर्श असा ठरणार आहे. 

चंद्राबाबू नायडू
आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही पोलावरमसह विविध प्रकल्प पूर्ण करू. इथे मी आज फक्त तुमच्यासाठी आलो आहे. तुमचे भविष्य ही माझी जबाबदारी आहे.  

अरविंद केजरीवाल
मोदी साहेब, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तुम्ही दिलेले हे आश्वासन पूर्ण केले नाही. आज तुमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात याबाबतचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे तुम्ही दिल्लीच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. यावरून हे सिद्ध झाले, की तुम्ही खोटं बोलत आहात. असे असेल तर जनता तुमच्या इतर आश्‍वासनांकडे कसा विश्वास ठेवेल? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 
मागच्या पाच वर्षात जनतेचे जे सहकार्य मिळाले, त्यामुळे आम्ही यशस्वीपणे सर्व गोष्टी करू शकलो, यामुळे मी देशवासियांचा आभारी आहे. भारतात विविधता असल्यामुळे विकासाचाही वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार केला गेला आहे व सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना, मजूरांसाठी योजना, व्यापाऱ्यांसाठी योजना अशा विविध योजना आणणार आहेत. आमचे हे संकल्पपत्र राष्ट्राच्या समृद्धी व विकासासाठी समर्पित आहे. - आज भाजपचा जाहीरनामा 'संकल्पपत्र' प्रसिद्ध झाला. या कार्यक्रमात बोलताना मोदी.

शरद पवार
संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीच्या अमरावती मतदारसंघातील अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित कार्यकर्त्यांना आणि मतदारांना शरद पवार यांनी संबोधित केले. याबद्दल ट्विट करताना ते म्हणाले, 'या सरकारने धनगरांना फसवले, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात उभे राहिले, राज्यात आघाडी सरकार असताना मुस्लीम समाजाला दिले गेलेले आरक्षण हे सरकार येताच काढून घेतले गेले. त्यामुळे हे सरकार उलथवून देशात व राज्यात परिवर्तन केल्याशिवाय गत्यांतर नाही. देशात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारने अनेक आश्वासने दिली, मात्र शेवटी जनतेची फसवणूक केली. त्यामुळे संयुक्त पुरोगामी लोकशाही महाआघाडीच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यासारख्या उमेदवारांना निवडून आणणे प्रचंड गरजेचे आहे.'

राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरुन 'अब न्याय होगा' हे काँग्रेसचे प्रचार गीत ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'न्याय या संकल्पनेसह काँग्रेसने जाहिरनामाद्वारे भारताच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मोहिम राबविण्याचा प्रयत्न राहील.'

अखिलेश यादव
विकास विचारतोय : भाजपचे लोक एवढे निवांत कसे काय आहेत? कारण त्यांना माहित आहे की आपण परत निवडूण येणार नसल्याने कुठलेही आश्वासन पुर्ण करावे लागणार नाही. जनता भाजपचा 2014 चा जाहीरनामा घेऊन बसली आहे. आता एक वेळ तरी भाजपच्या लोकांनी जनतेमध्ये जाण्याची हिंमत दाखवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com