Loksabha 2019 : पवार, फडणवीसांच्या सांगता सभांबाबत उत्सुकता

मिलिंद संगई
शनिवार, 20 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर येथे सांगता सभा होणार असल्याने या दोन्ही सभांमधून राष्ट्रवादी व भाजपच्या तोफा कशा धडाडणार या कडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष आहे. 

बारामती (पुणे) : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार रविवारी (ता. 21) थंडावणार आहे. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदापूर येथे सांगता सभा होणार असल्याने या दोन्ही सभांमधून राष्ट्रवादी व भाजपच्या तोफा कशा धडाडणार या कडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष आहे. 

नेहमीच्या रिवाजानुसार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार बारामतीत दुपारी तीन वाजता मिशन ग्राऊंडवर सभा घेणार आहेत. तर मुख्यमंत्री इंदापूरात सांगता सभा घेणार आहेत. 

राष्ट्रवादीकडून भाजपावर झालेल्या आरोपांना फडणवीस कसे उत्तर देतात तर दुसरीकडे अमित शहा यांच्या सभेनंतर शरद पवार मोदी शहा यांच्यावर कसा प्रहार करतात याचीच लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

सांगता सभेनंतर शरद पवार बारामतीत पत्रकार परिषदही घेतात, त्यात भविष्यातील राजकीय समीकरणांचा उहापोह ते करतात, त्या मुळे रविवारी बारामतीत पवार असा उहापोह करणार का या बाबतही उत्सुकता आहे. 
दुसरीकडे आपल्या खास शैलीसाठी प्रसिध्द अजित पवार हेही अमित शहा, चंद्रकांत पाटील, फडणवीस यांचा कसा समाचार घेणार या बाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. 

गेल्या काही दिवसातील प्रचारादरम्यान झालेल्या आरोपांनाही दोन्ही बाजूंकडून नेमके कसे उत्तर मिळते व सांगता सभांमधून मुख्यमंत्री व शरद पवार नेमकी मतदारांना काय आश्वासने देणार या बाबतही औत्सुक्य आहे. 

Web Title: excitement for rallies of Sharad Pawar and Devendra Fadnavis