RahulWithSakal : काँग्रेसचा जाहीरनामा मूठभरांनी तयार केलेला नाही : राहुल गांधी (राहुल गांधींची मुलाखत)

Rahul Gandhi and Abhijeet Pawar
Rahul Gandhi and Abhijeet Pawar

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.

प्रश्‍न - सध्या तुम्ही देशभर प्रचार करत आहात. काँग्रेस मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन जात आहे. पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी काय सांगाल? तो कसा तयार करण्यात आला?

उत्तर - जाहीरनाम्याची तयारी सुरू केली तेव्हा पहिल्यांदाच मी पक्षातील विचारवंत, तज्ज्ञ आणि वेगवेगळ्या व्यावसायिक गटांमधल्या सदस्यांना स्पष्टच सांगितले, की तुम्हाला काय अपेक्षित आहे, हे मला माहीत आहे. त्यात मला रस नाही. देशातील सर्वसामान्य जनतेला काय हवे आहे, यात मला स्वारस्य आहे. त्यातून तयार होणारा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा म्हणून प्रसिद्ध होणार असला तरी, प्रत्यक्षात तो देशाचाच जाहीरनामा असायला हवा; काही मूठभरांनी तयार केलेला नको. छत्तीसगडमध्ये आम्ही एक प्रयोग केला. हजारो लोकांशी आम्ही पद्धतशीररीत्या संवाद साधला. 

थेट समाजातील संबंधित घटकांपर्यंत पोचून त्यांची यादी तयार करण्यास मी आमच्या टीमला सांगितले. मी त्यांना असेही सांगितले, की प्रथमदर्शनी अव्यवहार्य वाटणाऱ्या कल्पना कोणाकडून आल्या तरी त्या झिडकारू नका, मला त्या कल्पना हव्या आहेत. 

एखाद्या शेतकऱ्याने जर काही अगदी अशक्‍य वाटणारी गोष्ट सुचविली तरी मला ती हवी आहे. त्याच्या मनात काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. सर्व माहिती, कल्पना, सूचनांचे संकलन झाल्यानंतर आपण ठरवूयात की त्यातील काय घ्यायचे ते. आमचा जाहीरनामा हा अशा लोकसहभागाच्या प्रक्रियेतून तयार झाला आहे. तो पारंपरिक पद्धतीचा जाहीरनामा नाही.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com