पुण्यातून बापट तर बारामतीतून कुल यांच्यासह अनेकांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी तीन अर्ज तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. 4) आहे.

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी तीन अर्ज तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून चार उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवार (ता. 4) आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य उमेदवारांकडून बुधवारी (ता. 3) अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीने गिरीश बापट यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. जॉन्सन वसंत कोल्हापुरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पुणे लोकसभा मतदारसंघातून आजअखेर एकूण चार उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या वतीने कांचन राहुल कुल यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच, दीपक शांताराम वाटविसावे, ऍड. गिरीश मदन पाटील यांनी अपक्ष म्हणून तर, नवनाथ विष्णू पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, शिरुर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस होता. मात्र, आज एकही अर्ज आला नाही. अर्ज खरेदी करण्याची सुरवात झाली आहे. यामध्ये 18 इच्छुक उमेदवारांनी 38 अर्ज खरेदी केले आहेत.

Web Title: Girish Bapat and Kanchan Kool filled nomination Form from Pune and Baramati Constituency respectively