LokSabha2019 : मावळमध्ये बारणे - जगतापांचे मनोमिलन; गिरीश महाजनांनी घातला मेळ

उत्तम कुटे
सोमवार, 1 एप्रिल 2019

पिंपरी : मावळचे खासदार व शिवसेनेचे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे आणि त्यांचे कट्टर विरोधक भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यातले तीव्र मतभेद संपविण्यात भाजपचे 'ट्रबलशूटर ' आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना सोमवारी यश आले. त्यामुळे बारणे व पर्यायाने महायुतीला मावळात मोठा दिलासा मिळाला आहे. 
शिवसेना उपनेत्या डॉ नीलम गोर्हे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना जे जमलं नाही ते महाजन यांनी करून दाखवलं आहे. 

भाऊंचे मन वळविण्यात त्यांना आज यश आले. बारणेंना निवडून आणायचे आहे, असा आदेशच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिला. ही मात्रा लागू पडली. जगताप हे बारणे यांचा प्रचार करण्यास तयार झाले असून दोन दिवसात ते त्यात सामील होणार असल्याचे भाजपचे शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी सरकारनामाला रात्री सांगितले. महाजन, जगताप यांच्या बैठकीत सहभागी झालेले शिवसेनेचे आमदार अँड गौतम चाबुकस्वार यांनीही त्याला दुजोरा दिला. 

जगताप यांच्या बंगल्यावर सायंकाळी ही मनोमिलनाची बैठक झाली. ती पावणेदोन तास चालली. महाजन या बैठकीसाठी खास नगरहून आले होते. त्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर जगतापांनी चाबुकस्वार यांच्याकडून मावळमधील प्रचाराचा आढावा घेतला. तसेच आणखी काय केले पाहिजे त्याबाबत मोलाच्या सूचना दिल्या. नंतर त्यांनी त्याबाबत मावळचे भाजप आमदार आणि पुणे जिल्हा अध्यक्ष बाळा ऊर्फ संजय भेगडे यांच्याशी सुद्धा चर्चा केली.

Web Title: Girish Mahajan take Initiative Jagatap and barne come together in Maval