#PravingaikwadForPune 'प्रविण गायकवाड यांना उमेदवारी द्या'

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

आता काँग्रेसने मोहन जोशी यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा विचार करावा, अशी मागणी नेटिझन्सकडून केली जात आहे. .

पुणे : पुण्यातून काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसने मोहन जोशी यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा विचार करावा, अशी मागणी नेटिझन्सकडून केली जात आहे. .

काँग्रेसकडून पुण्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रवीण गायकवाड यांच्यासह मोहन जोशी, अरविंद शिंदे इच्छुक होते. तसेच प्रवीण गायकवाड यांनाच उमेदवारी मिळेल, अशी शक्यताही वर्तवली जात होती. मात्र, काँग्रेसने गायकवाड यांना उमेदवारी नाकारून मोहन जोशी यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे आता मोहन जोशी यांना काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीवर पुन्हा विचार करून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी द्यावी, असा जोर लावला जात आहे.

Web Title: Give Candidacy to Pravin Gaikwad from Pune Loksabha Demanding Netizens