Loksabha 2019: बारामतीच्या लेकीला एकदा संधी द्या : कांचन कुल

मिलिंद संगई
बुधवार, 3 एप्रिल 2019

बारामती - नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून कांचन कुल यांना विजयी करण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी आज केले. बारामतीत कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पाटील बोलत होते. केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा घेत त्यांनी विकासांच्या योजनांचा उहापोह केला. बारामतीच्या लेकीला एकदा संधी द्या, या संधीचे नक्की सोने करुन दाखविन असे कांचन कुल यांनी यावेळी बोलताना सांगितले केले. आता थांबायच नाही तर लढायच आहे, असे म्हणत या निवडणूकीसाठी तयार असल्याचे त्या म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, पिकविम्याची व्याप्ती वाढविल्यामुळे 87 लाख शेतक-यांना पिकविम्याचा लाभ घेत आला. 3100 कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली. स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत 32 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले होते. साडेचार वर्षात त्यात तब्बल आठ लेख हेक्टरची वाढ मोदी सरकारने केली. 

या राज्यातील शेतक-यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी राज्य शासनाने केली, 52 लाख शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, याची माहिती उपलब्ध आहे. 
मोदींना महिलांच्या समस्या कळतात का, मोदींनी कधी शेती केली होती का अशी टीका केली जाते पण मोदींनीच पाच कोटी मोफत गॅसचे कनेक्शन दिले, शेतक-यांना सुखी करण्याचे निर्णय घेतले. मराठा समाजाला आरक्षण देत नोक-यात आरक्षण प्रक्रीया सुरु ठेवली आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. गेल्या साडेचार वर्षात राज्यात लाठीमार किंवा गोळीबार झालेला नाही असे सांगत कांचन कुल यांना निवडून देण्याचे आवाहन पाटील यांनी केले. 

या प्रसंगी राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, राजेंद्र काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. अँड. नितिन भामे यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहीर चर्चेची तयारी...
कर्जमाफीच्या मुद्यावर माझी कोणाशीही जाहीर चर्चा करण्याची तयारी आहे. कागदपत्रांसह मी या चर्चेसाठी येण्यास तयार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी आव्हान दिले. कर्जमाफीवर होणारी टीका निरर्थक असून आमची खरी तुमची खोट कर्जमाफी असा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: give me one chance to prove says kanchan kool