कारणराजकारण : मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारणेंना मतं द्या : आ. भोईर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

उरण : नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बरणेंना मत द्या असे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांनी सकाळच्या कारणराजकारण या मालिकेत केले. श्रीरंग बारणे यांनी जे एन पी टी बंदरापासून ३० किमी अंतरावरील आठ पदरी रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उरण : ''नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बरणेंना मतं द्या'' ,असे स्थानिक आमदार मनोहर भोईर यांनी 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेत केले. श्रीरंग बारणे यांनी जेएनपीटी बंदरापासून ३० किमी अंतरावरील आठ पदरी रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी सांगितले

''शेज सारखा मोठा प्रकल्प येत आहे त्याच्या माध्यमातूनही एक ते दीड लाख तरुणांना नोकऱ्या मिळतील नवनवीन व्यवसायही तयार होतील'',असे भोईर म्हणाले. मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी बंदरही येथे उभे करण्याचे काम चालू असल्याचे आ. भोईर यांनी सांगितले.

''गेल्या निवडणुकीत बारणेंना जवळपास २२००० हजार मतांनी पिछाडीवर होते. पण त्यावेळी बारणे या भागातील नसल्याने कोणाला माहित नव्हते. आता ते त्यांच्या विकास कामामुळे सर्वांना माहीत आहेत. त्यांनी विकासकामे केली आहेत. म्हणून या निवडणुकीत ही येथील जनता बरणेंना विकासकांच्या जोरावर मोठे मताधिक्य मिळवून देईल. '', असा विश्वास आ. भोईर यांनी व्यक्त केला.

Web Title: Give Votes to Shrirang Barne for Narendra Modi says MLA Bhoir