Loksabha 2019 : त्यांना मत दिले तर चौकीदार व्हाल, आम्हाला दिले तर मालक व्हाल : सुप्रिया सुळे 

supriya-sule
supriya-sule

उंडवडी - ''विरोधकांना नावं ठेवण्यासाठी मुद्दाच राहिला नाही. मुख्यमंत्री साडे चार वर्षात कितीवेळा आपल्याकडे आले. मुख्यमंत्री दौंडमध्ये ऊसाला 2600 भाव रुपये देतो म्हणाले होते आणि मिळाले 1900 रुपये. दूधाला प्रती लिटरला पाच रुपये अनुदान देतो म्हणाले होते, पण सुरवातीच्या कालावधीत दिले. त्यानंतर अनुदान दिलेच नाही. पेट्रोल डिझेलचे दर वाढवून ठेवले. मात्र शेतकऱ्याच्या शेती मालाला बाजारभाव मिळत नाही. सरकार शेतकऱ्याच्या अनेक प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.'' अशी टीका सुप्रिया सुळे यांनी उंडवडी सुपे येथे केली. यावेळी आपल्याला राज्यात आणि देशात परिवर्तन करायचे आहे. त्यांना मतदान केले तर चौकीदार व्हाल, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केले तर मालक व्हाल असेही त्या बोलताना म्हणाल्या.

उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या लोकसभेच्या प्रचार सभेत खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, सदस्य भरत खैरे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बिल्डर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र खराडे, वनिता बनकर, ऍड. स्नेहा भापकर, उपसरपंच पोपटराव गवळी, माजी सरपंच बापूराव गवळी, प्रतापराव गवळी, विकास गवळी आदीसह परिरसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

''राज्यात अनेक आंदोलने झाली. पण काहीही उपयोग झाला नाही. सरकार अनेक गोष्टीवर असंवेदनशील आहे. धनगर समाजाचे आरक्षण मी पाच वर्षे सातत्याने लोकसभेत मांडत राहिले. मात्र तेथे एक मंत्री म्हणाला, ''महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव नही भेजा'', असेही त्यांनी सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले. साडे चार वर्षे धनगर आरक्षणावर सरकार आभ्यास करतय. शाळा, शिक्षण, वीज, अंगणवाडी, रस्ते, धरणे, पाणी योजना अगदी सगळा विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात झाला आहे. आपले सरकार असते तर तीन महिन्यापूर्वीच जनावरांच्या चारा छावण्या सुरु झाल्या असत्या. मात्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. वयोश्री योजना देशात बारामती मतदार संघात एक नंबरने राबविली गेली. आपल्याकडे सत्ता नसतानाही आपण वायोश्री योजना यशस्वी केली. पुढच्या पाच वर्षात आम्ही साडे तीनशे कोटीचा निधी केंद्रातून पिण्याच्या पाण्यासाठी मतदार संघात देवून सर्व गावे टॅंकर मुक्त गावे करणार आहे. जलसंधारणाची कामे बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र अपेक्षित पाऊस नाही झाला. त्यामुळे यंदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. टिका करण्यासाठी विरोधकांना मुद्दा नाही. त्यामुळे विरोधक काहीही बोलतात असेही त्या म्हणाल्या. 

आम्ही कोणालाही सविंधान बदलू देणार नाही. आपण सविंधनामुळे आपण एक आहोत. सविंधनातील पहिली ओळ माहिती आहे का ? संविधानचे वाचन प्रत्येक शाळेत ग्रामपंचायतीमध्ये वाचले गेले पाहिजे. पवारांवर टीका केल्यावर विरोधकाला मोठे झाल्यासारखे वाटते. मिडियात बातम्याची हेडलाईन होते. मुख्यमंत्री उद्या 13 तारखेला बारामती तालुक्यातील सुप्याला येणार आहेत. ते पाण्याबाबत बोलणार आहेत. त्यांनी आपल्याला 15 लाख रुपये दिले आहेत. पाच वर्षात त्यांनी आपल्याला फसवले आहे. सत्याचा प्रवासाच आयुष्यात जिकतो .. साम, दंड, भेद ते वापरत आहेत. आपण सहा मतदार संघात प्लसमध्ये राहू असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले. 

दरम्यान, ऍड. स्नेहा भापकर, राजेंद्र खराडे, भरत खैरे, दिलीप परकाळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास गवळी तर आभार सुहास काळे यांनी मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com