Loksabha 2019 : मोदींना प्रभावित होऊन भाजपमध्ये : गंभीर

Loksabha 2019 : मोदींना प्रभावित होऊन भाजपमध्ये : गंभीर

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सांगितले, की ''मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विकासाचा दृष्टीकोन पाहून प्रभावित झालो आहे. त्यातूनच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पक्षात मी चांगली कामगिरी करून दाखवेन''.

गौतम गंभीरने आज केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली. गंभीर म्हणाला, ''अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांनी पक्षात प्रवेश दिला, याबाबत मी त्यांच्यासह भाजपचेही आभार मानतो. भाजपने मला देशासाठी काहीतरी करण्यासाठी संधी दिली. मी पंतप्रधान मोदी यांना प्रभावित झालो. त्यानंतर मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाला माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन''. 

तसेच भारतीय क्रिकेट संघात असताना जे काही केले ते करण्याचा प्रयत्न करेन. भाजपने माझ्यासाठी एक मोठे व्यासपीठ दिले आहे. त्याचा मी देशासाठी वापर करेन. याशिवाय सरांचे (जेटली, रविशंकर) आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचे आभार मानतो, असेही गंभीर म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com