Loksabha 2019 : यापुढे निवडणूक लढविणार नाही : शरद पवार

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार पक्षातील नेत्यांच्या बैठकीतून घेण्यात आला.

मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांना दिलेली ही उमेदवारी पक्षातील विचार लक्षात घेऊन दिली गेल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. तसेच आपण यापुढे निवडणूक लढविणार नाही. मात्र, पक्षाला मार्गदर्शन करत राहणार आहे, असेही ते म्हणाले. 

'साम'' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवैधानिक संस्था दुबळ्या केल्या. मोदी सरकारची पावले देशासाठी धोकादायक आहेत. राज्य आणि देशाचा कारभार ज्यांच्याकडे आहे, त्यांची दृष्टी विपरीत आहे. त्यांच्याकडून संवैधानिक संस्थांवर हल्ला केला जात आहे. मात्र, आता संवैधानिक संस्था जपल्या पाहिजेत.

बारामती आणि मावळचा उमेदवार बैठकीतूनच

बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार पक्षातील नेत्यांच्या बैठकीतून घेण्यात आला आहे. आम्ही मावळमध्ये अनेकवेळा पराभूत झालो होतो. त्यामुळे ही जागा लढविण्याचा विचार पक्षातून केला जात होता. तसेच पार्थ पवार यांच्या नावाचा विचार केला जात होता. त्यानंतर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

Web Title: I will not Contest Election in Future says Sharad Pawar