Loksabha 2019: शेवटी निर्णय जनतेच्या न्यायालयातच : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

नागपूर - केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी येत असून, उत्साहवर्धक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच, लोक मला पाठिंबा देत आहेत याबद्दल मला आनंद आहे. विरोधी पक्षाला जे काही बोलायचे आहे ते त्यांनी बोलावे. शेवटी जनतेच्या न्यायालयातच निर्णय होतो असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, लोक जात, धर्म, पंथ सगळे विसरुन विकासाला मतदान करत आहेत हा लोकशाहीचा विजय आहे, असेही ते म्हणाले. 

गडकरी यांच्या पत्नी कांनच, मुलगा सारंग आणि सून यांनी देखील मतदान केंद्रावर असलेल्या गर्दीमुळे आनंद व्यक्त केला. गडकरी पाच लाख मतांनी निवडून येणारच असा विश्वासही सारंग गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. 

Web Title: I will win with a bigger margin says Nitin Gadkari