Loksabha 2019 :...तर माझ्याही घराची झडती घ्या : पंतप्रधान

Loksabha 2019 :...तर माझ्याही घराची झडती घ्या : पंतप्रधान

सिद्धी (मध्य प्रदेश) : कायदा हा सर्वांसाठी समान असतो, मी काही चुकीचे केले असेल तर माझ्याही घराची झडती घ्यायला हवी, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते येथे आयोजित सभेत बोलत होते. तुघलक रोड निवडणूक गैरव्यवहाराचा उल्लेख करताना राहुल यांच्या प्रचारासाठी कोणाचा पैसा वापरला जात आहे, असा सवालही त्यांनी केला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरील प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा संदर्भ देताना मोदी म्हणाले, की ही मंडळी आता तपाससंस्था आम्हाला लक्ष्य करत असल्याचे रडगाणे गात आहेत; पण ही मंडळी गैरव्यवहारांमध्ये सहभागी असल्यानेच त्यांच्यावर छापे घालण्यात आले होते. मी भ्रष्टाचारामध्ये सहभागी असेल तर मलाही माफ करू नका, माझ्या घरावरही छापे घातले जावेत. विरोधकांचे धोरण हे एक तर चोर आणि वर शिरजोर अशा स्वरूपाचे आहे. केंद्र सरकार मध्य प्रदेशातील विविध विकास योजनांसाठी पैसे पाठविते; पण मध्य प्रदेशातील कॉंग्रेस सरकार ते गिळंकृत करते.''

कमलनाथ यांच्या सरकारने ग्राहकांना वीजदरामध्ये सवलत देण्याच्या नावाखाली विजेच्या पुरवठ्यालाच कात्री लावली आहे, यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता कॉंग्रेसला मतदान करणार नाही, असा दावाही त्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com