Loksabha 2019 : 'मोदी सत्तेवर आल्यास अमित शहा गृहमंत्री'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

- माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद वीरमणी आणि रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर विमल जालान होऊ शकतात उत्तम अर्थमंत्री. 

नवी दिल्ली : "जर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर पक्षाध्यक्ष अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री बनतील. मग अशा देशाचे काय होईल, याचा विचार करावा,'' असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) केले. 

केजरीवाल यांनी याबाबत आज ट्विट केले. "ज्या देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील त्या देशाचे काय होईल, याचा जनतेने मतदानापूर्वी विचार करावा,' असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटबरोबर त्यांनी भारतातील निवडणुकांच्या कल अंदाजाबाबत निवडणूक यंत्रणांची पोस्ट टॅग केली आहे. जर मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर अमित शहा यांची निवड गृहमंत्रिपदी होईल, असा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे.

तसेच, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद वीरमणी आणि रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर विमल जालान हे उत्तम अर्थमंत्री होऊ शकतात, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If Narendra Modi again comes to power then Amit Shah will be the Home Minister says Arvind Kejriwal