Loksabha : युतीचा पराभव करायचा असल्यास एकत्र या : अजित पवार

वृत्तसंस्था
शनिवार, 23 मार्च 2019

भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले. 

मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले. 

महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे. तसेच यावेळी त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला. महाआघाडीत सामील न होणारे भाजपची 'बी टीम' म्हणून काम करत आहेत.   

तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच भाजप-सेनेचे मंत्री जुमलेबाज आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you want to defeat the alliance then Come together says Ajit Pawar