कारणराजकारण : इथे उमेदवारचं पोचले नाहीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : उध्दवस्त झालेले संसार सावरायला मतदान करणार का?, असे विचारल्यावर त्यांच्यापर्यंत अद्याप उमेदवारच पोचले नसल्याची माहिती समोर आली. कालवा फुटीमुळे लोकांच्या संसारावर शब्दशः पाणी फिरले, या पाणी फिरलेल्या संसारांचे उंबरठेही अद्याप उभे राहिले नाहीत, ही खंत आहे दांडेकर पूल वसाहतीतील लोकांची.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #कारणराजकारण - भाग दोन ही मालिका फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून सुरु असून  दांडेकर पूल वसाहतीती स्थानिकांसोबत संवाद साधला.

''आपत्तीग्रस्त म्हणून जी तुटपुंजी मदत मिळाली त्यामधून घराची भिंतही उभी राहू शकलेली नाही. ऊन, पाऊस, वारा यापासूनही सरंक्षण मिळालेले नाही, किंवा त्यासाठी आश्वासन देण्यासाठीही उमेदवार या परिसरात फिरकलेच नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Interaction with localized people at Dandekar Bridge