Loksabha 2019 : 'मोदींच्या 56 इंचाच्या छातीत शेतकऱ्यांना जागाच नाही'

वृत्तसंस्था
रविवार, 24 मार्च 2019

भाजप सरकारने नागवं केले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पायदळी तुडविण्याचे काम भाजपच्या मोदी सरकारने केले.

कऱ्हाड : देशाला भगवा नाही. भाजप सरकारने नागवं केले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पायदळी तुडविण्याचे काम भाजपच्या मोदी सरकारने केले. त्यांची छाती 56 इंच आहे. मात्र, त्या छातीत शेतकऱ्याला जागा नाही. असे सरकार उलथवून लावा, असे आवाहन दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले.

संयुक्त महाआघाडीच्या प्रचाराची सभा येथे सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले, आमदार मोहनराव कदम, आनंदराव पाटील, विश्वजित कदम, रामराजे निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, देवराज पाटील, मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील- चिखलीकर यांच्यासह महाआघाडीच्या घटपक्षातील जोगेंद्र कवाडे, खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी उपस्थित आहेत.

निवडणुका म्हणजे ही परीक्षेची वेळ. कॉपी करण्याची वेळ नाही. सध्याचे सरकार उलथून टाका, असे कवाडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jogendra Kawade Criticizes Narendra Modi