Loksabha 2019 : दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी

Loksabha 2019 : दिंडोरीतून गावित यांना उमेदवारी

वणी (नाशिक) :  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जीवा पांडू गावित यांचे नाव जाहीर झाले. वणी येथे मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बोलवलेल्या बैठकीत निवडणूक लढविण्याबाबत एकमताने ठराव संमत करीत आमदार जे. पी. गावित यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली.

नाशिकचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन भोसले यांनीही माकपला पाठिंबा देत महाराष्ट्रातून जेपींच्या रुपाने माकपचा पहिला खासदार निवडून आणण्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले. आदिवासींचे प्रश्‍न, वनहक्क चळवळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीप्रश्न आदी विषयांवर आदिवासींच्या लॉंग मार्च काढून देशभर प्रसिद्धी मिळवली. 

जीवा पांडू गावित हे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले व महायुतीचे उमेदवार भारती पवार यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करणार आहेत. याचा सर्वांत मोठा फटका महाआघाडीला बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com