#कारणराजकारण डॉ. कोल्हे यांचे हडपसरवर लक्ष

सचिन बडे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

डॉ अमोल कोल्हे यांच्यासारखा स्टार चेहरा राष्ट्रवादीने शिरूर मतदारसंघात दिल्यानंतर इथली लोकसभा निवडणुक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले. डॉ कोल्हे आज हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा, रॅली, कोपरा सभा घेत आहेत. आजचा संपुर्ण दिवस त्यांनी हडपसरसाठी ठेवला आहे. 

पुणे : डॉ अमोल कोल्हे यांच्यासारखा स्टार चेहरा राष्ट्रवादीने शिरूर मतदारसंघात दिल्यानंतर इथली लोकसभा निवडणुक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले. डॉ कोल्हे आज हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा, रॅली, कोपरा सभा घेत आहेत. आजचा संपुर्ण दिवस त्यांनी हडपसरसाठी ठेवला आहे. 

हडपसर हा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासूनचा बालेकिल्ला. गेल्या मनपा निवडणुकीत मोदीलाटेत चारही नगरसेवक इथून राष्ट्रवादीचे निवडून आलेत. ही हक्काची मत निश्चित करून या भागातून मताधिक्य मिळवायचा त्यांचा प्रयत्न आहे.

हडपसर भागात माळी समाजाची मत निर्णायक ठरतात. त्यामुळेच गेल्यावेळी कोल्हे हे शिवसेनेकडून आढळरावांचे स्टार प्रचारक होते. यंदा ते माळी कार्ड ते स्वतःसाठी आजमावणार आहेत.

हडपसर हा भाग शहरी असल्याने कोल्हे यांनी शहरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच महापाचलिकचे एकही अधिकृत वाहनतळ हडपसरमध्ये नाही, घोरपडी उड्डाणपूलाचे अपुर्ण काम , अपुरा पाणी पुरवठा, हे मुद्दे कोल्हे यांचा प्रचारामध्ये प्रमुख मुद्दे आहते. कोल्हे हडपसरच्या प्रत्येक भागात फिरत आहेत. त्यांच्या प्रचारसभांना युवकांचा प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. तसेच विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले असल्याने य भागाचा विकास झाला नसल्याचे कोल्हे प्रचारदम्यान सांगत आहेत.

Web Title: KaranRajkaran Amol Kolhe concentrates on Hadapsar in Shirur Loksabha 2019