कारणराजकारण : शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत रंगली खडाजंगी! (व्हिडिओ)

गुरुवार, 11 एप्रिल 2019

शिरुर लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या गावांपैकी लोणी हे एक! 'सकाळ'च्या कारणराजकार या मालिकेअंतर्गत येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत लाईव्ह गप्पा झाल्या. हे कार्यकर्ते मतदारसंघात झालेली विकास कामे आणि प्रलंबित विकास काम यावर भरभरुन बोलले.

लोणी काळभोर (पुणे) : शिरुर लोकसभा मतदारसंघातील महत्वाच्या गावांपैकी लोणी हे एक! 'सकाळ'च्या कारणराजकार या मालिकेअंतर्गत येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत लाईव्ह गप्पा झाल्या. हे कार्यकर्ते मतदारसंघात झालेली विकास कामे आणि प्रलंबित विकास काम यावर भरभरुन बोलले.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे कार्यकर्ते या चर्चेमध्ये सामील झाले होते. विद्यमान खासदार आढळराव पाटील यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेली विकास कामे, मोदी सरकारच्या विविध योजना यावर युतीचे कार्यक भरभरुन बोलले. तर, आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रलंबित विकास कामे, वाहतूक कोडीं, मंदावलेला विकास, खासदारांची भेट न होणे,यावर भर दिला. 

दरम्यान, कार्यकर्त्यांनी चर्चा करत असताना, गली गली शोर है, मोदी चोर हैं, चौकीदार चौर है, तसेच मै भी चौकीदार, अशा घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Karanrajkaran discussion among all party workers at Loni kalbhor