कारणराजकारण : विश्वास ठेवा ही नदी आहे! (व्हिडिओ)

बुधवार, 10 एप्रिल 2019

नीरा नदीची परिस्थिती भीषण आहे. वाळूउपसा आणि नदीकडे झालेले दुर्लक्ष या दोन कारणांमुळे फक्त नदीची ही दुरावस्था झाली आहे, याचा थेट परिणाम इथल्या आजूबाजूंच्या 22 गावावर झालेला आहे.

निरवांगी (ता. इंदापूर) : नीरा नदीची परिस्थिती भीषण आहे. वाळूउपसा आणि नदीकडे झालेले दुर्लक्ष या दोन कारणांमुळे फक्त नदीची ही दुरावस्था झाली आहे, याचा थेट परिणाम इथल्या आजूबाजूंच्या 22 गावावर झालेला आहे.

नदीच्या या दुरावस्थेसाठी मागील काही दिवसापूर्वी इथल्या गावकऱ्यांनी सलग आठ दिवस नदीत उपोषण केले होते. गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते जलसंपदा मंत्र्यापर्यंत आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा केला असून यावर कुठल्याही प्रकारचा आम्हाला न्याय मिळाला नाही.

Web Title: Karanrajkaran discussion on drought in Indapur tehsil